रक्षाबंधनाच्या औचित्य साधून महात्मा फुले चौक येथे सीसीटीव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

रक्षाबंधनाच्या औचित्य साधून महात्मा फुले चौक येथे सीसीटीव्ही कॅमेराचा लोकार्पण सोहळा संपन्न

या उपक्रमाच्या माध्यमातून चैन स्नेकींग सारख्या घटनावर आळा बसेल

लोकसहभागातून संपूर्ण शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविणार – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी- राखी पौर्णिमा सण म्हणजे भाऊ बहिणी मधील असलेले अतूट नाते व प्रेम होय भावाचे काम बहिणीचे संरक्षण करणे व पाठीमागे उभे राहणारे असते साठी राखी पौर्णिमेच्या औचित्य साधून शहरातील माता-भगिनींचे चोरांपासून संरक्षण व्हावे यासाठी उत्तम दर्जाचे एच.डी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे टीम 57 फॅमिली पान पकवान सेंटरच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्ये पार पाडत असतात,सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पर्वते यांच्या सामाजिक कामाचा आदर्श घेऊन, विविध संस्थांनी व नागरिकांनी पुढे येऊन संपूर्ण शहरांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढे यावे, या सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबडणाऱ्या चोरट्यांवर बायबंदी घालण्यास मदत होईल व अनुचित घटना रोखण्यास मदत होईल. स्वप्निल पर्वते यांनी कोविड काळामध्ये केले कार्य कौतुकास्पद असून आज त्यांनी एक सामाजिक बांधिलकीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम हाती घेऊन समाजाला प्रेरणा दिली असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

आ.संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे टीम 57 फॅमिली पान पकवानच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवण्याचा लोकार्पण सोहळा परमपूज्य अलोक ऋषीजी महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आ.संग्राम जगताप,राम पर्वते,कालिदास पर्वते,स्वप्निल पर्वते,नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा.नगरसेवक संजय चोपडा,नाना पांडुळे,राजेंद्र बोथरा,प्रकाश इवले,राम पर्वते,शिवाजी विधाते,राजेंद्र बेद्रे,आ.डी.मंत्री,धर्मा करांडे,तात्या दरेकर,छबुराव कांडेकर,मळू गडाळकर,नाना साळवे,सोनू घेमुड,योगेश मोहाडीकर, अजित कर्णावट,भागवत कुरधने,सतिष वारुळे,दिनेश बोरा,राजू जगताप, सचिन पर्वते,राहुल रासकर,संदीप सपाटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना स्वप्निल पर्वते म्हणाले की,आ. संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. महात्मा फुले चौक हा गजबजलेला व्यावसायिकांचा परिसर आहे हा चौक हा मुख्य चौक असल्यामुळे या ठिकाणाहुन नागरिक आपापल्या घरी जात असतात त्याची पाळत ठेऊन चोर त्यांना भर रस्त्यात लुटण्याचे काम करतात गेल्या काही दिवसात या परिसरामध्ये अशा घटना मोठ्या प्रमाणात घडले आहे त्यामध्ये विशेष म्हणजे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचे प्रमाण या चौकात व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहे. अशा परिस्थितीमध्ये या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी व माता भगिनींचे संरक्षण व्हावे यासाठी रक्षाबंधनाच्या औचित्य साधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम आम्ही राबवला आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!