रखडलेल्या रस्त्याचे अखेर कामाला सुरुवात.
मनपा आयुक्त यांनी घेतली निवेदनाची दखल.
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कॉलेज येथील विद्युत महावितरण कार्यालय शेजारी असलेल्या हाजी हसन शहा कादरी कब्रस्तान येथे अनेक भाविक दर्शनासाठी येजा करत असून या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. परंतु अर्धा रस्ता पूर्ण होऊन अर्धा रस्ता खोदलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे तेथे ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून येण्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
रमजान सण आल्याने येथे मुस्लिम समाज बांधव हे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी व नमाज पठण करण्यासाठी येतात त्यामुळे कब्रस्तान परीसर स्वच्छ करण्यात यावा व सदर परिसरात औषध फवारणी करून व रस्त्यावरील ड्रेनेज व घाण पाणी साचलेले आहे या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली असता या मागणीची दखल घेत रस्त्यावर साचलेले ड्रेनेजच्या पाण्यावर मुरूम टाकून रस्ता येण्या जाण्यासाठी चांगल्या अवस्थेत करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शिंदे उपस्थित होते..
- Advertisement -