रहिवासी भागातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन

अहमदनगर प्रतिनिधी :- लहू दळवी

शहरातील स्टेशन रोडवर उड्डाणपुलाचे काम चालू आहे. त्या संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. या रस्त्यांवर धुळीचे व खड्ड्यांचे साम्राज्य झालेले आहे. नागरीक कोरोणाच्या भीतीने नाहीतर या धुळी पासून संरक्षण व्हावे म्हणून मास लावून शहरभरात वावरत आहे.

या सर्व त्रासातून आयुष्य जगत असताना सर्वसामान्यांना आता अजून एक जीवघेण्या गोष्टीला सामोरे जावे लागत आहे. उड्डाणपुलाच्या लगत असलेले जो काही रहिवासी भाग आहे या भागातून अवजड वाहने दिवसरात्र भरधाव वेगाने चालू आहे. या परिसरात लोकांचा वावर कमी झाला असून लहान मुलांचे खेळणे बंद झाले आहे.

लोकांना मुठीत जीव घेऊन वावर करावा लागत आहे. त्याच बरोबर अंतर्गत रस्त्यांचेअवजड वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे.इंपिरियल चौक, चाणक्य चौक, माणिक नगर भागातून अवजड वाहने अंतर्गत कॉलनी भागातून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.प्रशासना या गोष्टी लक्ष देऊन लवकरात लवकर पर्याय काढावा.या भागातील बेरीकॅट लावून नागरिकांची सोय करून द्या.

लोकांच्या जीवाशी खेळ बंद करा असे निवेदन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले.

शहरातील खड्ड्यांचे दुरुस्ती कामाची पाहणी आयुक्तांनी दुचाकीवर करावा. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नगरकर रस्त्यांची झालेली दुरवस्थामुळे त्रस्त झाले आहे. आंदोलन, निवेदन करूनही आम्हालाच लाज वाटते कुठलेही रस्त्यावर खड्डे नाही असा एकही रस्ता नगर व शहरांमध्ये नाही. शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे परंतु या रस्त्याची पाहणी कोणी करत नाही. कोणत्या दर्जाचे काम चालू आहे. कोणत्याही पालिकेच्या अधिकाऱ्याला माहित नाही आयुक्त साहेबांनी स्वतः दुचाकीवर नगर शहरातील रस्त्यांची जे कामे चालू आहेत याची पाहणी करावी. व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी आम्ही नगरकर यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली. यावेळी सुमित वर्मा, प्राजक्ता दंडवते,प्रवीण गायकवाड, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!