कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द या गावामध्ये शुक्रवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्री ढगफुटी झाली आहे.या मुळे या गावातील शेतकऱ्यांचा ऊस, कांदा व तूर या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी सर्वत्र जोरदार पाऊस झालेला नव्हता, राज्यात इतरत्र मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी होत असताना कर्जत मध्ये मात्र फक्त आभाळमाया असे चित्र दिसून येत होते, मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती मात्र अजूनही बहुतांशी भागामध्ये विहिरी तलाव नद्या कोरड्या ठाक आहेत.
शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी खुर्द या गावांमध्ये मात्र अक्षरश ढगफुटी झाली, या गावांमध्ये यापूर्वी पुरेसा पाऊस पडला होता.मात्र काल रात्री अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली हा पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पडला कि, या गावाच्या परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत,अनेक ठिकाणी शेताचे बांध फोडून पाणी दुसरीकडे पोहोचले असल्याचे दिसून येते.
या मध्ये शेतकऱ्यांची पिकासोबत माती देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेली आहे, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे.
या गावातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे,शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे त्वरित करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी गावच्या सरपंच मोहीनी धनराज कोपनर व सोसायटीचे चेअरमन विजय पावणे यांनी केली आहे.
झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तातडीने सर्व शेतकऱ्यांना मदत करावी.यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल.अवघ्या एका क्षणात शेतकऱ्यांची होत्याचे नव्हते झाले आहे.त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे,असे विजय पावणे यावेळी म्हणाले.
या ढग फुटी मध्ये या गावांमधील रोहिदास कारंडे,संभाजी कोपनर ,मनीषा कोपनर ,राजेंद्र पावणे,अमोल कोपनर ,सुरेश कारंडे, महादेव कारंडे, कामा पावणे,लालासाहेब कोपनर ,निलेश कोपनर ,संभाजी म्हस्के ,लक्ष्मण म्हस्के, सागर मदने,उपसरपंच दादा कारंडे ,रावसाहेब काळे,माजी सरपंच देविदास कोपनर,खंडू रुपनर,रामदास पिंगळे,दादा पाटील, दामोदर रुपनर, नामदेव कोरडकर,लाला शेख,बाळासाहेब काळे,धोंडीबा कोपनर,भानुदास कोपनर ,अनिल देवकते, पोपट काळे व इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.