राजाभाऊ कोठारी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांचा मुकमोर्चा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 

अहमदनगर प्रतिनिधी –  राजाभाऊ कोठारीयांच्यावर हल्ला करणार्‍या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी नगर शहर शिवसेना व सर्व हिंदूत्ववादी संघटनांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते,माजी शहरप्रमुख संभाजी कदम,नगरसेवक अशोक बडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,वसंत लोढा,विक्रम राठोड,अभय आगरकर,माजी महापौर भगवान फुलसौंदर,अभिषेक कळमकर,स्मिता आष्टेकर,अनिल शिंदे,दत्ता कावरे,दत्ता जाधव,बल्लू सचदेव,मयुर मैड, संजय शेंडगे,संतोष गेनप्पा,सुरेश तिवारी,वाल्मिक कुलकर्णी,हिराकांत रामदासी,भरत निंबाळकर,गौतम कराळे,सुनिल लालबोंद्रे,रवि लालबोंद्रे,संजय छजलानी, काका शेळके, दिपक खैरे,प्रशांत गायकवाड,बबलू शिंदे, सोपान कारखिले,सुमित वर्मा,गणेश कवडे,मिलिंद मोभारकर,कुणाल भंडारी, अरुणा गोयल,अशोक दहिफळे, गौरव ढोणे,संजय आव्हाड आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दोन दिवसापूर्वी सायंकाळी बाजारपेठेतून रामचंद्र खुंटाकडून झेंडीगेट येथे जात असतांना गाडीची हूल बसली असा खोटा बनाव करत त्यांनारस्त्यात आडवून कोणतीही चर्चा न करता सात ते आठ जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून समाजात तेढ निर्माण होईल,या हेतूने राजाभाऊ कोठारी व त्यांच्या समवेत असलेल्या तीन जणांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

राजाभाऊ कोठारी नगर शहरामध्ये अध्यात्मिक काम करत असून,नगर व जिल्ह्यात मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून त्याचे हे कार्य सुरु आहे.त्यांना जी जाणिवपूर्वक मारहाण करण्यात आली आहे.सदरील आरोपींवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा पोलिस प्रशासनाकडून त्यांना अटक केली जात नाही.यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

नगर शहरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत असून,या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी व सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

याप्रसंगी शिवसेना,भाजपा,मनसे,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,हिंदू राष्ट्र सेना,शिव प्रतिष्ठानसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होेते.
———

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!