राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभय जगताप याला सिल्व्हर मेडल

0
87

अहमदनगर प्रतिनिधी : पुणे येथील बालेवाडी संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत अभय भाऊसाहेब जगताप याने सिल्व्हर पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. मूळचा नगर जिल्ह्यातील लोणी प्रवराचा असलेला अभय जगताप हा औरंगाबादच्या टिमकडून राज्यस्तरीय स्पर्धेत उतरला होता. त्याने अतिशय चमकदार कामगिरी करीत सिल्व्हर पदकापर्यंत झेप घेतली. त्याला शितल जाधव, लहू भाटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. इयत्ता दुसरीत शिकत असलेला अभय जगताप याला वयाच्या पाचव्या वर्षापासून कराटेची आवड लागली. तो नियमित सराव करून विविध स्पधार्ंमध्ये चांगली कामगिरी करून दाखवत आहे.या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here