राज्यस्तरीय दहावी मिनी तलवारबाजी स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश

- Advertisement -

राज्यस्तरीय दहावी मिनी तलवारबाजी स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश

प्रशिक्षकांच्या माध्यमातून चांगला खेळाडू घडत असतो – आमदार संग्राम जगताप

नगर : विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आवडीच्या खेळाचे प्रशिक्षण घ्यावे सध्या क्रीडा क्षेत्राला देखील महत्त्व प्राप्त झाले असून यामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, खेळाडूंना खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे, याचबरोबर खेळाचे योग्य प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रशिक्षकाची आवश्यकता असते त्या माध्यमातून चांगला खेळाडू घडला जातो. सुनील गोडळकर यांनी खेळाडूंना बालवयातच तलवारबाजीचे प्रशिक्षण दिल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नगर शहरातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राज्यस्तरीय दहावी मिनी तलवारबाजी स्पर्धेत नगरच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. यावेळी प्रशिक्षक सुनील गोडळकर प्रा. संजय साठे, निलेश मदने, शैलेश गवळी, प्रा. संजय धोपावकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलास दवणे, प्रा. दिनेश भालेराव, विवेक सूर्यवंशी, प्रशांत गंधे, प्रदीप पाटोळे, सचिन गायकवाड, अविनाश काळे, वैष्णवी गोडळकर, होनाजी गोडळकर, वेदिका गोडळकर विनायक भुतकर, मुकुल काशीद, शंतनू पांडव आदी उपस्थित होते.

सुनील गोडळकर म्हणाले की, नाशिक येथे राज्यस्तरीय मिनी तलवारबाजी स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये रिद्धी महाडिक ब्रांच, वसुधा साठे सिल्वर, निधी देशमुख ब्रांच, गार्गी देशमुख सिल्वर, प्रांजल बडगु सिल्वर, अक्षय दौंड ब्रांच पदक प्राप्त केले आहे. तसेच प्रज्वल सत्रे आणि आर्यन सत्रे यांनी टॉप 8 रँकिंग मध्ये आले असून ओडिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची निवड झाली आहे. आमदार संग्राम जगताप नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात या माध्यमातून खेळाडूंना देखील प्रेरणा व ऊर्जा मिळत असते असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!