राज्यस्थरीय बॅडमिंटन स्पर्धेत नगरची विधी सैनी विजेती
पिंपरी चिंचवड(पुणे)-येथे दि.२८ ते ३१ मार्च २४ पर्यंत संपन्न झालेल्या राज्यस्थरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत नगरची उदयोन्मुख खेळाडू विधी सैनी हिने १३ वर्ष वयोगटात अंतिम सामन्यात ख्य्याती खत्रे या देशाच्या सातव्या मानांकीत खेळाडूवर २१-१२ व २१-१५ असा सरळ सेट मध्ये पराभव करून विजेतेपद व गोल्ड मेडल मिळवले.या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असो..च्या मान्यतेने योनेक्स राईज सिद्धांत स्मॅशमास्टर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत ६४ खेळाडूंचा समावेश होता.विधीने १५ वर्ष वयोगटातही तिसरा क्रमांक पटकावून ब्रॉंझ मेडलहि मिळवले.राज्याचे मुख्य पंच अनिरुद्धजोशी व संयोजिका संयोजिता घोरपडे यांच्या हस्ते विधीला पारितोषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या अगोदरही विधीने राज्यस्थरीय स्पर्धेमध्ये विविध वयोगटात पारितोषिके व विजेतेपद मिळविले असून येथील मॅक्सिमस अकॅडमीची खेळाडू आहे तिला प्रशिक्षक रोहित शर्मा,नवीन कुमार,व सोनाली मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.स्नायडर मधील अधिकारी राजिंदर सैनी यांची विधी कन्या असून तिच्या या यशाबद्धल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.