राज्यातील दिव्यागांसाठी MSCIT कोर्स चे अनामप्रेम मध्ये आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – येत्या १ मे २०२२ पासून अहमदनगर येथील अनामप्रेम संस्थेच्या वतीने MSCIT या कॉम्प्युटर कोर्स चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील १० वी पास असणाऱ्या व पुढील शिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग-अपंग यांच्यासाठी अत्यंत सवलतीच्या दरात हा MSCIT कोर्स असणार आहे.

अंध-अपंग-मूकबधिर-अस्थिव्यंग या दिव्यांग मुले -मुलीं हे प्रवेश घेऊ शकतील. या दिव्यांग यांची निवास व भोजन व्यवस्था अनामप्रेम संस्थेत असणार असून आजपासून प्रवेश सुरू करण्यात आले आहेत.

या MSCIT कोर्स चे प्रवेश मर्यादित स्वरूपात असणार असून केवळ १३०० रुपये शुल्क या कोर्स करिता आकारण्यात आले आहे. रोज सराव,कोर्स कालावधीत उपस्थिती, १३०० रुपये शुल्क, MSCIT परीक्षेसाठी उपस्थिती, आदी निकष अनामप्रेम संस्थेने ठेवले आहेत.

जे विद्यार्थी यंदा MSCIT कोर्स करिता प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना अनामप्रेम मार्फत उच्च शिक्षणासाठी मदत,मार्गदर्शन केले जाणार आहे. तातडीने या MSCIT कोर्स ला प्रवेश घ्यावा, असे आवाहन अनामप्रेम संस्थेने शिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग यांना केले आहे.

प्रवेशासाठी संपर्क –
अमृत दादा – 08975268318
प्रतीक्षा ताई – 09579079963
मीना ताई – 09604767426
विलास सर – 09049575341
प्रल्हाद सर – 09011750022

सर्व MSCIT कोर्सला प्रवेश घेतलेल्या लाभार्थी यांची निवास व्यवस्था अनामप्रेम, गांधी मैदान, स्नेहालय मागे,अहमदनगर येथे करण्यात येणार असल्याची माहिती अजित कुलकर्णी यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!