राज्यातील पाच मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत मध्ये होणार ६८ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

0
97

कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह राज्यातील चार मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.या मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व राज्यमंत्री दत्ता भरणे हे उपस्थित राहणार आहेत.

कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. कोरोना या जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव असताना दखील कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचे काम त्यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जो अनेक पिढ्यांपासून प्रलंबित होता असा एसटी डेपोचा प्रश्न सोडला.या डेपोच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे.यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय कर्जत पंचायत समितीची इमारत विस्तार करण्यासाठी तीन कोटी ८८ लाख, सर्व शासकीय कार्यालयांसाठी प्रशासकीय इमारत १४ कोटी ९९ लाख ,विस्थापित होणाऱ्या व्यावसायिकांसाठी व्यापारी संकुल ९ कोटी, महसूल कर्मचाऱ्यांची निवासस्थानासाठी १३ कोटी ८० लाख, अद्ययावत शासकीय विश्राम ग्रहसाठी ४ कोटी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ७ कोटी व तलाठी कार्यालय साठी ७ कोटी अशा कामांचा भूमिपूजन समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here