अहमदनगर प्रतिनिधी – मुळतहः सर्वसामान्य रुग्णांना मोफत व माफक दरांत उपचार देण्याच्या निकषांवर शासनाकडून जमीन , करमाफी सारख्या सुविधा मिळवणाऱ्या राज्यातील बहुतांश धर्मादाय रुग्णालयांत शासनाच्या महात्मा फुले जिवनदायी आरोग्य योजना ,आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित नाहीत.
याउलट राज्य धर्मादाय आयुक्तालयाने वेळोवेळी घालून दिलेले निकष उदा. रुग्णालयाच्या नावासमोर ‘धर्मादाय’ हे नाव लावने, धर्मादाय च्या आय.पी.एफ योजनेची माहिती रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना दिसेल अश्या प्रकारे दर्शनी भागात लावणे, मोफत प्रथमोपचार , आर्थिक द्रुष्टया दुर्बल रुग्णांच्या उपचारासाठी राखीव घाटा, डिपॉझिट रक्कमेशिवाय उपचार करणे इ.पाळण्यात दिरंगाई होत आहे.
मोठमोठ्या शहरातील बहुतांश धर्मादाय रुग्णालयांत रुग्णसेवा दूरच पण पंचतारांकित हॉटेल प्रमाणे लाखोंचे बीलं रुग्णांकडून उकाळीत आहेत. सर्वसामान्य रुग्णांना अश्या रुग्णालयात उपचार घेणे कठीण बनले आहे. असे जनआरोग्य फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष मा.योगिराज धामणे यांनी सांगितलं.
सध्याची परिस्थिती बदलून रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी “शासनाने मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या शासकीय आरोग्य योजना;सर्वसामान्य रुग्णांना मोफत व माफक दरात उपचारासाठी शासनाकडून सवलत मिळवत सुरु केलेल्या केलेल्या राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांत सुरु होणे गरजेचं आहे” अस मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांत शासकीय आरोग्य योजना सक्तीने सुरु करण्यात येण्यासाठी जनआरोग्य फाऊंडेशनच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे फाऊंडेशनचे प्रदेश संघटक मा. योगेश पिंपळे यावेळी म्हणाले.यावेळी मा. राहुल पाटोळे , मा. चेतन वानखेडे सह फाऊंडेशनचे आरोग्य सैनिक उपस्थित होते.