नेवासा प्रतिनिधी – कमलेश गायकवाड
राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी एक दिलाने कामाला लागण्याचे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तसेच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड तसेच त्यांच्या सोबत कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रेरणा स्थान राजू गोडसे ह्या औरंगाबाद येथे जाताना नेवासा फाटा येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम, नेवासा शहराध्यक्ष रंजन जाधव, सोशल मीडिया नेवासा तालुका अध्यक्ष सचिन बोर्डे यांनी सत्कार केला.
यावेळी शिक्षक कर्मचारी दत्तात्रय चौगुले, सुधाकर ताकटे, पुंडलिक चौधरी, भास्कर मामा लिहिणार, प्रा. डॉ जगदीश सोनवणे, आदी कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदार वर्षाताई गायकवाड यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. तसेच काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे व येणाऱ्या काळात महाराष्ट्रात व केंद्रात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी मन लावून एकदिलाने सर्व मतभेद विसरून काम करण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान केले.
मंत्री वर्षा गायकवाड यांचे आगमन होणार म्हणून कार्यकर्ते भर उन्हात खूप वेळ ताटकळत उभे असल्याचे लक्षात येताच त्यांनी येण्यास उशीर झाल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या विनम्र स्वभावाने उपस्थित कार्यकर्ते भारावून गेल्याचे दिसून आले.