रामवाडीत लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

रामवाडीत लक्ष्मी आईची यात्रा उत्साहात;कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी महालक्ष्मीचरणी साकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी आमावस्येनिमित्त रामवाडी येथे लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात पार पडली. पारंपारिक वाद्यांच्या गजरात पोतराज व भक्तगण यामध्ये सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पध्दतीने रामवाडी भागात हा उत्सव साजरा करण्यात आला.

रामवाडी यात्रा उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते लक्ष्मी मातेची आरती करुन यात्रा उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये व कोरोना महामारी नष्ट होण्यासाठी महालक्ष्मीचरणी साकडे घालण्यात आले. यावेळी रामवाडी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, सतीश लोखंडे, संजय परदेशी, दीपक सरोदे, अश्‍विन खुडे, अमित कांबळे, संकेत लोखंडे, किशोर फुलारे, राम गायकवाड, जीशान शेख  आदींसह समस्त रामवाडी मित्र मंडळाचे युवक उपस्थित होते. पारंपारिक वाद्यांचे गजर व लक्ष्मीमातेच्या जयघोषाने परिसर दणाणून निघाला होता. स्थानिक परिसरातून शोभायात्रा काढून भाविकांना भंडार्‍याचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!