रामवाडी झोपडपट्टीत कचरावेचक कामगार हॉस्पिटल उभारणीची मागणी

- Advertisement -

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे मनपा आयुक्तांना निवेदन

पंधराव्या वित्त आयोगांतर्गत रामवाडीत एक आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण झाल्यास आरोग्याचा प्रश्‍न सुटणार -विकास उडानशिवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचक, कष्टकरी कामगार वर्गासाठी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत कचरावेचक कामगार हॉस्पिटलची उभारणी (आरोग्यवर्धिनी केंद्र) करण्याची मागणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे.

शहरातील रामवाडी झोपडपट्टी सर्वात जुनी आणि मोठी झोपडपट्टी आहे. या भागात सात ते आठ हजार लोकसंख्या असलेली दाट लोकवस्ती आहे. या भागात प्रामुख्याने कचरावेचक कामगार मोठ्या प्रमाणात राहतात. जे रस्त्याने, कचराकुंडी व बाजारपेठे येथे असलेला सुका कचरा गोळा करून ते पुननिर्मितीकडे पाठवतात. त्यामधून मिळणाऱ्या तटपुंज्या उत्पन्नातून आपल्या जीवनाचा खर्च भागवतात. त्यातून मुलांचे शिक्षण करतात. महागाईच्या काळात त्यांना एवढे तटपुंजे वेतन पुरत नसल्याने ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी छोट्या आजाराचे मोठ्या आजारात रूपांतर होते. काही वेळेस अनेकांना जीवीलाही मुकावे लागते. हा कष्टकरी कामगार शहरांमध्ये असलेला सुका कचरा कोणताही मोबदला न घेता उचलतो. त्यामधून महानगरपालिकेचा देखील फायदा होत असून, स्वच्छता राहण्यास मदत होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात एक लाखाच्यावर लोकसंख्या असणारे या कामगारांची राज्य सरकारने दखल घेत 2005 च्या बर्मन समितीचा अहवाल असो की, 2016 चा घनकचरा व्यवस्थापनचा कायदा असो यामध्ये कचरा वेचक कामगारांची दखल घेतली आहे. त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावता येईल, त्यांच्या कामाला पत निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे. अहमदनगर महापालिकेमध्ये कचरा वेचक कामगारांना ओळखपत्रसह अन्य मागण्यांचा प्रस्तावही आहे. सध्या महानगरपालिकेच्या मार्फत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू असून, राज्य सरकारने शहरात 18 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यास मंजूरी दिली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. रामवाडी झोपडपट्टीतील कचरा वेचक, कष्टकरी कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने कचरा वेचक कामगार हॉस्पिटलची उभारण्याची मागणी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार पसरून अनेकांना डेंग्यू, चिकनगुण्या यांसारखे आजारांचा सामना करावा लागत आहे. रामवाडी झोपडपट्टी भागातील कचरावेचक, कष्टकरी कामगार आर्थिल दुर्बल असल्याने त्यांना आरोग्याच्या सुविधा सहजासहजी उपलब्ध होत नाही. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत 2022-23 मध्ये महाराष्ट्रात 994 नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र बनविण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. शहरासाठी 2021-22 मध्ये 12 आणि 2022-23 मध्ये 6 एकूण 18 केंद्र उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. या योजनेतंर्गत रामवाडी झोपडपट्टी या ठिकाणी एक आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण झाल्यास येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. -विकास उडानशिवे (जिल्हा समन्वयक, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत)

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles