राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅलीच्या प्रेक्षेपण कार्यक्रमास राष्ट्रवादी भवनला कार्यकर्त्यांची उत्स्फुर्त उपस्थिती

0
96

अहमदनगर(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे रविवारी (दि.12 डिसेंबर) व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रेक्षेपण राष्ट्रवादी भवनात आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

वरळी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमाचा लाईव्ह कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना व्हर्चुअल पध्दतीने सहभागी होता आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ.सौ.शिवले,मुन्नाशेठ चमडेवाले, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर,ओबीसी सेलचे अमित खामकर, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, विद्यार्थी शहराध्यक्ष वैभव ढाकणे, अशोक बाबर, प्रा. अरविंद शिंदे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, सुजाता दिवटे, साधना बोरुडे, रंजना उकिर्डे, लगड, उषा सोनटक्के, सुनिता पाचरणे, संतोष ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, निलेश इंगळे, मारुती पवार, कुमार नवले, अ‍ॅड. मंगेश सोले, सागर गुंजाळ, गणेश बोरुडे, अभिजीत सपकाळ, लहू कराळे, माजी नगरसेवक गौतम भांबळ, वैभव म्हस्के, भाऊसाहेब इथापे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील एक वर्षापासून माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी व्हर्चुअल रॅलीचे आयोजन केले जात आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते,विविध पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष खा.पवार यांचे विचार कार्यकर्त्यांना ऐकून प्रत्यक्ष कार्यक्रम पहाता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here