पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहीनीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची तोड करावी.- Advertisement -
अहमदनगर प्रतिनिधी – लवकरच पावसाळा सुरू होत असून वादळी पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू होत असतो कारण विजेच्या तारांवर मोठमोठी झाडे कोसळली जातात.त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.तसेच महावितरण कार्यालयाकडून वीजपुरवठा खंडित होतो.
यासाठी महावितरण कार्यालय पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहणीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष अभिजित खोसे,शहर जिल्हा महिला अध्यक्ष रेश्मा ताई आठरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सोमनाथ तांबे आदी उपस्थित होते.
शहरांमध्ये विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे.वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये विद्युत तारांवर झाडे कोसळली जातात त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो.यासाठी महावितरण कार्यालयाकडून झाडांच्या फांद्या ची तोडणी करने गरजेचे आहे.
याच बरोबर महावितरण कार्यालयाने पावसाळ्यापूर्वी तातडीने झाडांच्या फांद्यांची तोडणी करून रस्त्यावर पडलेल्या झाडांची व पालापाचोळ्या ची तातडीने उचलून नेऊन विल्हेवाट लावावी जेणेकरून विद्युत पुरवठा खंडित होणार नाही.
पडलेल्या झाडांमुळे नागरिकांना वाहतुकीच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी तातडीने पावसाळ्यापूर्वीच महावितरण कार्यालयाकडून उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
- Advertisement -