राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस म्हणून साजरी

0
91

महात्मा गांधीजींचे विचार व तत्वज्ञान अंगीकारल्यास जीवनाचा यशस्वी मार्ग सापडतो – आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधींनी अहिंसेने ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून लावली. सर्वसामान्यांना त्यांनी बलाढ्य शक्तीविरोधात लढण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. महात्मा गांधीजींचे विचार व तत्वज्ञान अंगीकारल्यास जीवनाचा यशस्वी मार्ग सापडतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पुण्यतिथी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. आयुर्वेद महाविद्यालय येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, निलेश इंगळे, फारुक रंगरेज, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, साधना बोरुडे, अर्जुन चव्हाण, विशाल बेलपवार, गौरव बोरुडे, दादा पांडूळे, शुभम भंडारी, मनोज आंबेकर, प्रा. अमोल खाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, जगातील अनेक महान व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरणा घेतली आहे. दीनदुबळ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणा देणारे असून, सक्षम भारतासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांची गरज आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची फाळणी होताना जहा राम रहेंगा, वहा रहिम रहेंगा! हा एकतेचा संदेश त्यांनी दिला. त्यांचे विचार संपुर्ण जगाने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. माणिक विधाते यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी होत असताना द्वेष व हिसाचाराचा त्याग करण्याचा संकल्प होण्याची गरज आहे. अहिंसा, धर्मनिरपेक्ष व एकतेने देशाचा विकास साधला जाणार आहे. महात्मा गांधीजी यांनी अन्यायाविरुध्द लढण्यासाठी सर्वसामान्यांना सत्याग्रहासारखे शस्त्र दिले व त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेला संघर्ष आजच्या युवकांना प्रेरणा देणारा असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here