राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावेडी उपनगर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी रोहित पवार तर उपाध्यक्षपदी शरद बोरुडे यांची निवड
शहरातील व्यापार उद्योग तसेच छोटे व्यावसायिक यांचे व्यावसायिकरण वाढविण्यासाठी काम केले जाईल – आ.संग्राम जगताप
नगर : व्यवसाय करीत असताना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी एकोप्याची खरी गरज असते या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले जात असतात, नगर शहरातील व्यापार उद्योग तसेच छोटे व्यावसायिक यांचे व्यावसायिकरण वाढविण्यासाठी काम केले जाईल, सर्वांच्या सहकार्यातून व्यापारी करणाला चालना मिळत असते. नवनवीन बाजारपेठा निर्माण होणे गरजेचे आहे. बाजारपेठेच्या माध्यमातून नागरिकांना आपापल्या भागामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. व्यापारी आघाडीच्या माध्यमातून विचार विनिमय होत असतो. या माध्यमातून एकमेकांमध्ये सलोखा निर्माण होतो. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावेडी उपनगर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी रोहित पवार तर उपाध्यक्षपदी शरद बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, पै.शिवाजी चव्हाण, सचिव प्रमोद डोळसे, खजिनदार केतन बाफना, उपाध्यक्ष संतोष भोजने, नूतन उपाध्यक्ष देवदत्त पाऊलबुद्धे,उपाध्यक्ष विनय पित्रोडा,खजिनदार प्रसाद कुलकर्णी,सहसचिव श्रीपाल कटारिया, नूतन सदस्य एल एम चव्हाण, अविनाश गुंजाळ, सचिन बाफना, मंगेश निसळ, आनंद कटारिया, अनुज गांधी, रोहित पवार, लक्ष्मीकांत चिट्टे आदीसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सावेडी उपनगर व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पडेल, व्यापाऱ्यांना सोबत घेवून प्रश्न मार्गी लावले जातील, आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शासन दरबारी व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू असे त्यांनी सांगितले.