पोस्ट ऑफिस येथे लाडक्या बहिणींचा जल्लोष
अहमदनगर : रक्षाबंधनाचा सण जवळ येत असताना राज्यातील महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आगळीवेगळी भेट दिली आहे.
नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी या योजनेच्या अंमलबजावणी बाबत विशेष पुढाकार घेत ऑनलाईन अर्ज भरीत जनजागृती केली. त्यामुळे अनेक भगिनींच्या पोस्ट खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले त्याबद्दल या योजनेच्या लाभार्थी बहिणींनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे विशेष कौतुक करीत अभिनंदन केले.
या योजनेतून मिळणारे १५०० रुपये ही गरीब महिलांसाठी संसाराला मदत करणारी ओवाळणी असलेल्या प्रतिक्रिया यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे दिल्या.
यावेळी बहुतांश महिलांच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आणि महिलांनी पोस्ट ऑफिस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके वाजून एकच आनंदोत्सव साजरा केला, महिलांनी एकमेकींना पेढे भरविले.
यावेळी सदस्य प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर, स्मिता कुलांगे, साधना बोरुडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.