राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात अचानक लाईट गुल होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन
विद्युत महावितरणच्या अधीक्षक अभियंतांच्या टेबलावर गॅस बत्ती व मेणबत्ती पेटून आंदोलन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहरांमध्ये व उपनगर परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने व शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली विद्युत महावितरण कार्यालयात विद्युत महावितरण कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्या टेबलावर गॅस बत्ती व मेणबत्ती पेटून आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर समवेत सुरेश बनसोडे, जॉय लोखंडे, सारंग पांधडे, प्रकाश भागानगरे माणिक विधाते, साहेबान जहागीरदार, केतन क्षीरसागर, गुड्डू खताळ, शहानवाज शेख, अंकुश मोहिते, मोना विधाते, येशूदास वाघमारे, परेश पुरोहित, ऋषिकेश ताठे, अब्दुल खोकर, लहू कराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, शहरात गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरिकांना तथा आपल्या ग्राहकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जात आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे विद्युत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात असून नागरिक हैराण झाले आहे. विद्युत पुरवठा हा सुरळीत करण्यात यावा व महावितरणाचे सर्व अधिकारी कर्मचारी व तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी हे फोन उचलत नाही व ग्राहकांची तक्रारीचे निवारण होत नसून योग्य ते उपाय योजना करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.