राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगर शहर उपाध्यक्ष शकील तांबोळी यांना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे नियुक्तीपत्र
युवकच समाजातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू शकतात – प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
नगर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शहरात संपन्न झाला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते शकील तांबोळी यांना पक्षाच्या नगर शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना या निवडीचे पत्र देखील देण्यात आले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, इंजी.केतन क्षीरसागर, विनीत गाडे, गणेश बारस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून युवकांनी पक्षाचे ध्येय धोरण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत घेवून जावे, सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात, युवक खऱ्या अर्थाने समाजातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावू शकतात असे ते म्हणाले.
यावेळी शकील तांबोळी म्हणाले की, पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल आणि पक्ष वाढीसाठी कार्य करेल, आ. संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावण्याचे काम करेन असे ते म्हणाले.
- Advertisement -