राष्ट्रवादी भवन येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
अहिल्याबाईंचे जनतेसाठी कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी – अभिषेक कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत आसाराम कावरे, अंबादास बाबर, सचिन ढवळे, किरण सपकाळ, चैतन्य ससे, महेश जाधव, अभिषेक जगताप, नीताताई बर्वे, हेमलता पाटोळे, खुशी जाधव, सुलेचना पाटोळे, अक्षय शेटे, गौरव भिंगारदिवे, भीमराज कराळे, विक्रम पाटोळे, प्रणित पंडित, गुलाबराव नन्नवरे, उमेश भांबरकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अभिषेक कळमकर म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्याबाई होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. स्त्रीयांमधील उत्तम राज्यकर्त्या म्हणून त्या पुढे आल्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदिरे व नदीघाट बांधले. अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असून समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान आहे. अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना सन्मानाची वागणुक मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.