राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल येथे वृक्षरोपण; जिल्हा समाज कल्याण विभागाचा उपक्रम

0
92

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा सहकारी बँक समोरील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल अहमदनगर येथे श्री संत गाडगे महाराज छात्रालयाच्या विद्यार्थ्या समवेत जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री.राधाकिसन देवढे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे, समाज कल्याणचे लेखापाल श्री राघवेंद्र चव्हाण, समाज कल्याण विभागाचे निरीक्षक कैलास झुंगे, श्री बाबासाहेब भोईटे,वसतिगृह अधिक्षक बाबासाहेब पातकळ,संजय बोबडे,सुखदेव पवार,प्रदीप वरखेडकर,अविनाश वावरे,भाऊराव जाधव,दादासाहेब पुरणाळे,राधाकिसन मुरदारे, नवनाथ फटांगरे,भाग्यश्री नाकील, अश्विनी अकोलकर,मंदा बोबडे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वसतिगृह अधिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.तसेच शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी राधाकिसन देवढे म्हणाले की,” सर्वांनी वृक्ष संवर्धन करणे व पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यावश्यक झाले आहे.वृक्ष संवर्धन केले तरच भावी पिढ्याचे आरोग्य व्यवस्थित राहील.अन्यथा ग्लोबल वॉर्मिग व इतर समस्या मुळे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होईल. ते होऊ नये म्हणून सर्वांनी पर्यावरणाचे संवर्धन करावे.प्रत्येक नागरिकाने या कर्तव्याची जाणीव सतत ठेवावी.

“यावेळी संस्थेचे प्रमुख अॅड’ डॉ.विद्याधर काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या शाळेच्या व संस्थेच्या प्रगती बद्दल जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी समाधान व्यक्त केले.
अधीक्षक बाबासाहेब पातकळ यांनी वस्तीगृहात राबवीत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली .

राष्ट्रीय पाठशाळेच्या व संत गाडगे महाराज छात्रलयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.आभार अधीक्षक बाबासाहेब पातकळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here