राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त नगरमध्ये मोफत प्रशिक्षण वर्ग 

0
94

अहमदनगर प्रतिनिधी – नगरमधील प्रतिबिब शिक्षण संस्थेच्या वतीने राष्ट्रीय विणकर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आद्यवस्त्र निर्माता भगवान जिव्हेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले, दि ७ ऑगस्टला ऐतिहासिक महत्व आहे या दिवशी विदेशी कापडाची होळी करण्यात आली म्हणून मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन( विणकर दिन)म्हणून घोषित केला व २०१५ पासून हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.व दरवर्षी संस्थेच्या वतीने हा दिन साजरा करण्याचे ठरले त्याप्रमाणे या वर्षी साजरा करण्यात आला.

साळी,कोष्टी,पदमसाळी आदी विणकर समाजातील लोक हे मुळातच कलावंत आहेत त्यानी आपला परंपरागत हातमाग व्यवसाय बंद झाल्यावर इतर कलेचे क्षेत्रामध्ये गेले पण समाजात आजही बेरोजगार मोठ्या प्रमाणत आहे त्यासाठी व सर्व समाजातील गरजू व गरीब मुलींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यामध्ये शिवणकाम,ब्युटी पार्लर व फोटोग्राफी,नेलं आर्ट,मेहंदी व इतर प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी शहरातील विविध संस्था व संघटनेच्या सहकार्याने २३ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे,युवक युवतींनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेवून आत्मनिर्भर व्हावे याकरीता हे सुरु करण्यात आले असून वय वर्षे १७ च्या वरील कोणीही बंधू भगिनी सहभागी होऊ शकतात.
हे प्रशिक्षण ना नफा ना तोटा किंवा कमवा व शिका या योजनेच्या धर्तीवर देण्यात येणार आहे.प्रशिक्षणवर्ग पुर्ण करणाऱ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन,शासकीय/निमशासकीय स्तरावरील कर्ज योजना यांच्या माहिती द्वारे मदत करन्यात येईल.तरी इच्छुकांनी प्रतिबिंब शिक्षण संस्था,  लिंकरोड  आयएमए भवन जवळ,स्वप्नांपुर्ती(250 फ्लॅट) रोड, दत्तनगर चौक, अहमदनगर येथे किंवा  व्हाट्सअप नं ९२८४९३०६७४ वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकानी  केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here