राहता तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घरोघरी मोफत डिजिटल सात बारा उतारा वाटपाची सुरुवात

0
96

लोणी प्रतिनिधी – महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व गांधी जयंतीचे औचित्य साधत स्वाक्षरीसह संगणकीकृत डिजिटल मोफत सात बारा उतारा वाटप राहाता तालुक्यातील प्रत्येक सजेत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मा. आ. श्री राधाकृष्ण विखेपाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राहाता तालुक्यात राबविण्यात आली.

महाराष्ट्र शासन यांच्या अनुषंगाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त महसूल विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त दि.२ ऑक्टोबर पासुन लाभार्थी शेतकरी आणि खातेदारांना स्वाक्षरीसह संगणकीकृत डिजिटल मोफत सात बारा उतारा वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.याच पार्श्भूमीवर राहाता तालुक्यातील प्रत्येक गावात मोफत डिजिटल सात बारा उतारा वाटप करण्यात आले.

लोणी बुद्रुक ता. राहाता येथे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, यांच्या हस्ते सात बारा उतारा वाटप करण्यात आला.

सदर प्रसंगी मंडलाधिकारी मांढरे सो., कामगार तलाठी ठाकरे सो., लोणी बुद्रुक सोसायटीचे चेअरमन सी एम विखे पा., लोणी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य प्रविण विखे पा., भाऊसाहेब विखे पा., व नारायण बेंद्रे उपस्थित होते.

राहाता तालुक्यातील मोफत सात बारा उतारा वाटप शुभारंभ करण्यात आला. सदर मोहीमे अंतर्गतराहाता तालुक्यातील सर्व गावात शंभर टक्के शेतकरी खातेदारांना मोफत सातबारा उतारा चे वाटप घरपोच कामगार तलाठी यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here