राहुरी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त कृषी समितीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे राहुरी तालुक्यातील सहा गावातील उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विद्यापीठ सेवेत प्रशासनाने सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूजल संरक्षण कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण चालू केले यावेळी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष विजय शेंडगे, राहुल शेटे, श्रीकांत बाचकर, सम्राट लांडगे, लक्ष्मण वाघ आदींसह प्रकल्पग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सन 1968 साली विद्यापीठ स्थापन झाले त्यावेळी 584 खातेदारांचे एकूण 2849.88 हेक्टर जमिनीचे संपादन केले आहे कुटुंबातील व्यक्तीला विद्यापीठ सेवेत घेण्याबाबत कायदा पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 6(क) नुसार शासन तरतूद असताना सुद्धा विद्यापीठ प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना डावलले जात आहे विद्यापीठ मध्ये 1 जून 2019 पर्यंत मंजूर पदांपैकी गट क व गट ड संवर्गातील 1314 पदे रिक्त आहेत 2008 पर्यंत व 2009 मध्ये विद्यापीठाने 394 प्रकल्पग्रस्त उमेदवारांना विद्यापीठ सेवेत सामावून घेतलेले आहेत उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना लवकरात लवकर विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

राहुरी तालुक्यातील खंडाबे, संडे, वरवंडी, राहुरी खुर्द, पिंपरी अवघड, डिगस या सहा गावातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोशाचे वातावरण निर्माण होत. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी क्र. 6 व 8 नुसार विद्यापीठ उर्वरित प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त भरती बाबत उचित कारवाई करावी. व  विद्यापीठांमध्ये 25 टक्के पर्यंत रिक्त जागा आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासन मंत्रालयीन प्रशासन व विद्यापीठ प्रशासन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील तसेच न्याय नाही मिळाला तर उपोषण व आंदोलन तीव्र करण्यात येईल व उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना विद्यापीठ सेवेत सामावून घेईपर्यंत शांत बसणार नाही असे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles