कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
नव्याने प्रदर्शित होणाऱ्या दडपण चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते निलेश आहेर व सहनिर्माते अभिनेता नितीन आहेर यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांच्या हस्ते सत्कार स्विकारला.भैलुमे यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश आहेर व सहनिर्माता अभिनेता नितीन आहेर हे कर्जत येथे आल्याचे समजतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ॲड.पी.बी.कोपनर युवक शहराध्यक्ष सागर कांबळे युवक तालुका उपाध्यक्ष लखन आप्पा भैलुमे प्रसिद्धी प्रमुख देवा खरात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.अशी माहिती सोशल मिडियाचे शहरप्रमुख विनोद थोरात यांनी दिली.