रेणुका माता मंदिर,नागापूर येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते घटस्थापना

0
81

रेणुका माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान – आ. संग्राम जगताप

कोरोनाचे संकट दूर व्हावे देवीचरणी प्रार्थना

अहमदनगर प्रतिनिधी – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नागापूर येथील रेणुकामाता देवस्थानच्या वतीने आ.संग्राम जगताप याच्या हस्ते आज महापूजा,आरती करून घटस्थापना करण्यात आली.

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की,नागापूर येथील रेणुका माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला पुरातन काळातील धार्मिक वारसा लाभलेला आहे मानवी जीवनावर आलेले कोविडचे संकट दूर व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

याप्रसंगी यावेळी अध्यक्ष प्रभाकर भोर,खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त साहेबराव भोर,राजू भोर,दत्तात्रय विटेकर,गोरख कातोरे,विष्णू भोर,किरण सप्रे,कचरू भोर,सुखदेव सप्रे,किरण कतोरे,नगरसेवक राजेश कातोरे,अभिजित खोसे,भैया वाबळे,रोहन बारस्कार आदिसह देवस्थानचे विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

कोरोनाच्या अटी व शर्तींच्या नियमाचे पालन करून भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here