अहमदनगर प्रतिनिधी – रेल्वे स्टेशन भागातील बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरु करावी,या मागणीचे निवेदन कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संपत शिंदे यांना भाजपाचे युवा वॉरिअर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे यांनी दिले.
याप्रसंगी विजय घासे,चंद्रकांत खटके,संतोष म्हस्के,राहुल तांबे,सागर सपकाळ,असिम शेख,रोहन गोंटे, सचिन माने,गणेश जाधव,भागवत कुरधने,सफल जैन आदि उपस्थित होते.
पोलिस निरिक्षक यांना देण्यातआलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नगर शहरातील रेल्वे स्टेशन हा प्रवासी वर्दळीने नेहमीच गजबजलेला परिसर आहे.या परिसरात मागील काळापासून पोलिस चौकी बंद असल्याने येथे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरु झाले आहेत.दिवसा ढवळ्या प्रवासी लुटमार,चैन स्नॅकिंग,छेडछाड सारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
या परिसरातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक,माता-भगिनी आणि मुलांना मुक्त संचार करता यावा;कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे.यासाठी खुप दिवसांपासून बंद असलेली रेल्वे स्टेशन येथील पोलिस चौकी सुरु करावी,जेणे करुन भविष्यातील एखाद्या मोठ्या दुर्घटनेला आळा बसेल.असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी विशाल खैरे म्हणाले,रेल्वे स्टेशन भागात पुर्वी पोलिस चौक असल्याने येथील कायदा सुव्यवस्था अबाधित होती.परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही चौकी बंद झाल्याने अनेक अवैध धंदे वाढले बसून,प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.रात्री या भागातील नागरिकांना फिरणेही मुश्किल होत आहे.तेव्हा तातडीने या भागात पोलिस चौकी पुन्हा सुरु करुन पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा,अशी आमची मागणी असल्याने सांगितले.