व्याख्यानात उलगडले शारीरिक व मानसिक बदलाचे रहस्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शहरातील शाळांमध्ये वयात येणार्या किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी संदर्भात स्वच्छता व आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते.या व्याख्यानास शालेय विद्यार्थिनींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.

शारीरिक व मानसिक बदलाचे रहस्य उलडून, रिअसेंबल कापडी पॅड घरी बनविण्याचे मुलींना प्रात्यक्षिक दाखविले. हे पॅड मुलींच्या आरोग्यासाठी उपयुक्त कमी खर्चात तयार होत असून, त्याचा पुनर्वापर करता येत असल्याने पर्यावरणासाठी देखील उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी रोटरी क्लब प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शशी झंवर, सचिव देविका रेळे, लिटरसी डायरेक्टर प्रतिभा धूत, व्होकेशनल डायरेक्टर कुंदा हळबे, पर्यावरण डायरेक्टर माधुरी झंवर, जागृती ओबेरॉय, प्रकल्प समन्वयक छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया उपस्थित होते.
इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाईल्ड निमित्त किशोरवयीन मुलींमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.दिवाळीनंतर शाळा सुरु झाल्यावर हा उपक्रम सुरु राहणार आहे.व्याख्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका योगिनी क्षीरसागर, गितांजली भावे, उज्वला भंडारी, वैशाली वाघ, जयश्री तोकशिया, सौ.मुळे यांनी परिश्रम घेतले.