शेवगाव प्रतिनिधी-निकेत फलके
स्रियांनी आपसातील द्वेष ,मत्सर बाजूला ठेवून एकमेकींच्या पाठीशी उभे राहून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीचे अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी केले.
रोटरी क्लब व तनिष्का महिला मंडळ अमरापूर आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिलांनी एकमेकींना रक्षासूत्र बांधले.चौधरी पुढे म्हणाले,यापुढील काळात स्त्रीनेच स्रियांचे संरक्षण करून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण करून निकोप समाजाच्या प्रगतीमध्ये योगदान दिले पाहिजे.
यावेळी वंदना चौधरी,संगीता भुजबळ,मनीषा दिवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमासाठी तनिष्का महिला मंडळाच्या कविता सुसे, मीना आढगळे, आशाबाई सरोदे,मनीषा खंडागळे,रंजना खरात,शाहीन शेख आदी.उपस्थित होत्या.