अमृत योजनेचे राहिलेले ५ टक्के काम पूर्ण होणे गरजेचे – मा.महापौर बाबासाहेब वाकळे
अहमदनगर प्रतिनिधी – येथील रोहकले गल्ली,नालेगाव हडको, मुन्सिपल कॉलनी या ठिकाणचे २८ लाख रु खर्चाचे रस्ता कॉंक्रिटीकरणचे काम करण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे हस्ते करण्यात आले. दलितवस्ती निधी व जिल्हास्तर निधी यामधून सोनाली अजय चितळे यांच्या पाठपुराव्यातून महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात हे काम मंजूर करण्यात आले होते. येथे प्रथम ड्रेनेज लाईन टाकण्यात आली,फेज टू ची लाइन टाकून पाण्याचे नळ कनेक्शन मारण्यात आले व नंतर कॉंक्रिटीकरण करण्यात आले त्याचे उद्घाटन वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
नगरसेविका सोनाली चितळे, भाजपाचे मध्य नगर मंडल अध्यक्ष अजय चितळे, देवदत्त भागवत, सतिष ताठे, सदाशिव रोहोकले,संदीप अकोलकर,सुनील साठे,सुभाष कोरडे,संदीप लोटके,बलराज वाकचौरे,शांतवन बडेकर ,संजय पटेकर ,शिवाजी लांडे, संतोष रोहेकेल, शशिकांत वाकचौरे, युनुस शेख,प्रमोद बोरुडे,डॉ उमेश पाखले,पै.संदीप ठाणगे, श्रीकांत माचवे,मनोज बागडे,गोविंद पेंढारे,शिंदे अण्णा,मनोज बागडे, पाडळे सर,संजय घोडके,गोविंद वाकचौरे,निलेश कांबळे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.महापौर वाकळे म्हणाले माझ्या कार्यकाळात अमृत योजनेचे काम ९५ टक्के पर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागला नसता तर तेही काम पूर्ण झाले असते राहिलेले ५ टक्के काम पूर्ण झाले तर नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो,अमृत योजना व फेज टू योजना या दोन्ही वेगळ्या असून फेज टू योजना म्हणजे शहरात नवीन पाईपलाईन टाकणे हे होय तर अमृत योजना म्हणजे मुळा डॅम्प ते पंपिंग स्टेशन पर्यंत जास्त क्षमतेची नवीन पाण्याची मेन लाईन टाकून नवीन यंत्रणा कार्यान्वित करणे हे काम होय.
शहरात कितीही पाईपलाईन टाकल्या तरी अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय त्याचा उपयोग नाही म्हणून ते होणे गरजेचे आहे, त्यासाठी भारतीय भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी व सर्व नगरसेवक पाठपुरावा करत आहोत.
ते पुढे म्हणाले नगरसेवक सोनालीताई चितळे पाठपुराव्यामुळे गांधीमैदान व गाडगीळ पटांगण भाजी बाजार येथे महिलांसाठी स्वच्छतागृह ,सांगळेगल्ली, कवडेगल्ली ,कुंभारगल्ली या भागात रस्ता कॉंक्रिटीकरण याची कामे झाली आहेत.मुनोत इस्टेट मध्ये डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे.
या सर्व कामासाठी माझ्याकडून सुमारे ९० लाख रुपये निधी मंजूर करून घेऊन त्यांनी हे काम पूर्ण केलेले आहे. त्याच्या प्रयत्नाने वार्डात खुप कामे मार्गी लागली आहेत व लागत आहेत सर्वसामान्यसाठी सदैव तत्पर असलेले चितळे दांपत्याचे भविष्य उज्वल आहे असेही ते म्हणाले.
नगरसेविका चितळे यांनी कामाची माहिती देऊन आभार मानले .