विठू नामाच्या गजराने शाहूनगर दुमदुमले
अहमदनगर प्रतिनीधी – विक्रम लोखंडे
ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहत साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमांस विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम महाराज, मीराबाई ,मुक्ताबाई,हाता मध्ये झेंडे घेतलेले वारकरी यासारख्या अनेक वेशभूषा धारण करून शाळेपासून शाहूनगर बस स्टॉप मार्गे माधव नगर मधील विठ्ठल मंदिरात पायी दिंडी काढण्यात आली.यावेळी वारकऱ्यांनि वेगवेगळे संदेश असलेले फलक हाता मध्ये घेतले होते.
बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा,एक पाऊल स्वच्छते कडे या दिंडी मध्ये विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायची माहिती सांगण्यात आली.
कार्यक्रमांची सुरुवात श्री विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्तिचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमासाठी संस्थचे सचिव संदीप भोर, खजिनदार प्रसाद जमदाडे, मुख्याध्यापिका सौ.रुचिता जमदाडे, शिक्षिका सौ. मनिषा बर्डे, सौ.निशिगंधा गायकवाड, सौ.पल्लवी पाटील, सौ. सुनंदा घंगाळे यांनी खूप परिश्रम घेतले.