काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,शेतकरी संघटनेकडुन केंद्र सरकारचा कडाडून निषेध
नेवासा प्रतिनिधी :- कमलेश गायकवाड
लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकरी आंदोलनास चिरडणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ नेवासा तालुक्यात बंदसह जोरदार निदर्शने,निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांबाबत आणलेले तीन काळे कायदे रद्द करण्यात यावेत.यासाठी दिल्ली सीमेवर एक वर्षांपासून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी विविध राज्यातून शेतकरी आंदोलन,मोर्चे काढत आहेत.
या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी अहिंसात्मक मार्गाने केलेल्या आंदोलनास केंद्रातील भाजप सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने गाड्या घालुन चिरडुन टाकण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये जवळ आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तसेच अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले,याशिवाय पीडित शेतकऱ्यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील अटक करण्यात आली.या सर्व घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले.तसेच दोषींसह केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला त्वरीत अटक करण्याची मागणी सर्व देशभरातुन करण्यात आली,या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यभर बंदची हाक दिली.
आज नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौकात महाविकास आघाडीतील काँग्रेस,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,शेतकरी संघटना,शेतकरी बांधव,यांनी लाखीमपूर घटनेचा निषेध करून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व निदर्शने केली.यावेळी शेतकरी काळे कायदे मागे घेण्यात यावे तसेच मंत्री अजय मिश्राच्या मुलास तात्काळ अटक करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब यांनी आजच्या परिस्थितीची तुलना इंग्रजी सत्तेशी करून काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली,याशिवाय सहकार मोडीत काढण्याचा डाव या सरकारने केला असा आरोप केला,तसेच सर्वांनी एकत्र येवून एकजुटीने अन्याय्य विरोधात उभे रहावे असे आवाहन केले.
नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी कामगार विरोधी असून,या सरकारने देश विक्रीसाठी काढला आहे. अशी घनाघाती टीका केली,काँग्रेस पक्ष कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ नवले यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
शिवसेना पक्षाचे मच्छीद्र म्हस्के यांनी शेतकरी कायदे मागे न घेतल्यास व मंत्र्याच्या मुलास त्वरित अटक न केल्यास यापेक्षाही तीव्र भूमिका घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
शेतकरी समन्वय समितीचे बन्सी सातपुते यांनी केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याचे होणारे दुष्परिणाम, तसेच शेतीचे खाजगीकरण हे सरकार करत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आव्हान केले.
किसान सभेचे बाबा अरगडे यांनी आणीबाणीत देखील अशी बिकट परिस्थिती झाली नव्हती.इतकी वाईट परिस्थिती या मोदी सरकारच्या काळात झाली अशी टीका केली.यावेळी प्रहार संघटनेचे अभिजित पोटे,महिला काँग्रेसच्या शोभा पातारे,अशोक कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे गणेश झगरे,लक्ष्मण कडु, शिवसेनेचे सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,नानासाहेब तुवर,भाऊसाहेब मोटे, नारायण लोखंडे,अण्णा पटारे,असिफ पठाण,अंबादास इरले,राष्ट्रवादी काँग्रेसचे,तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले,काँग्रेसच्या एससी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड,गफूर बागवान नेवासा काँग्रेसचे संदीप मोटे,जितेंद्र पतंगे,शहराध्यक्ष रंजन जाधव,एससी विभागाचे राजेंद्र वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे,मुसाभाई बागवान,आकाश धनवटे,काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख सचिन बोर्डे,शोभा पातारे,संजय होडगर,राजु चव्हाण,शाम मोरे,चंद्रशेखर कडु,रमेश जाधव,आदींसह शेतकरी उपस्थित होते.