लव जिहादचा कायदा संसदेत आणण्यासाठी सभागृहात भूमिका मांडणार – खा.डॉ.सुजय विखे पाटील

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
राहुरी (प्रतिनिधी) – हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहाद चा कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की संसदेचे सध्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अविश्वासाच्या ठराव प्रसंगी बोलताना लव जिहादच्या कायद्या विषयी आपण निवेदन करणार असून अलीकडच्या काळात अशा घटना दुर्दैवाने वाढत आहेत. कोणतेही सरकार अशा घटना घडव्यात यासाठी काम करत नसते मात्र सरकार अशा समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यावर उपाय काढते. नगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दोन तीन घटना घडल्या असून पोलीस प्रशासनास वेळोवेळी कडक शब्दात सूचना आपण केल्या असल्याचे सांगताना खा.विखे म्हणाले की जिल्ह्यातील माता भगिनींच्या पाठीशी हा भाऊ सदैव असून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही , आणि हाच विश्वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो आहोत असे सांगितले.

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांच्या गदारोळामुळे अनेक महत्वाचे विषय सभागृहात चर्चेला येत नाहीत, त्यामुळे जनतेचेच नुकसान होत आहे. या आठवड्यात अविश्वास ठरावावर चर्चा होणार असून यात लव जिहाद कायदा करण्यासंदर्भात आपण नक्की निवेदन करू असे त्यांनी सांगून, जनआक्रोश मोर्चातून नागरिक आपली भूमिका मांडत आहेत ही चांगली गोष्ट असली तरी कुठल्या एका समाजाला आपण टार्गेट करत नाही, हे लक्षात घेऊन शासनही हा कायदा आणण्या पूर्वी याचा संपूर्ण अभ्यास नक्की करेल असे सांगितले. कायद्याच्या दृष्टीने अत्यावश्यक त्या सर्व बाजू पडताळून मग सरकार हा कायदा नक्की लागू करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मोर्चास भाजपा आ.नितेश राणे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.
राहुरीच्या वायएमसी मैदानातून हा मोर्चा निघून शहरातील जुने बस स्थानक , शुकलेश्वर चौक, शनी चौक, मार्गे जुने सरकारी दवाखान्याची परिसरात या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
मोर्चात महिला भगिनी, बजरंग दल, आरएसएस , भाजप, शिवसेना, यासह इतर पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्यां संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!