लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाज विखे यांच्या पाठीशी -सुनील शिंदे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाज विखे यांच्या पाठीशी -सुनील शिंदे


घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना एकजुटीने विखे यांचे काम करणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर (दक्षिण) लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून मातंग समाज त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्‍वास जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केला.

नगर (दक्षिण) लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा महायुतीचे घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना एकजुटीने त्यांचे काम करणार असल्याचा विश्‍वास देत विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, जिल्हा संघटक लखन साळवे, राज्य कोर कमिटी सदस्य ज्ञानेश्‍वर जगधने, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, पाथर्डी तालुका अध्यक्ष सिताराम शिरसाठ, संतोष उमप, अभिजीत सकट आदी उपस्थित होते.

पुढे जिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले की, महायुतीतील घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना विखे यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. महायुतीच्या माध्यमातून मातंग समाजातील अनेक प्रश्‍न सुटणार असून, काही प्रश्‍न देखील सोडविण्यात आलेले आहेत. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, प्रदेशाध्यक्ष कैलासभाऊ खंदारे व युवक प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात लहुजी शक्ती सेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्य करत आहे. नगर दक्षिण मध्ये लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता त्यांचे निष्ठेने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!