कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याची गरज – डॉ. अमित बडवे
अहमदनगर प्रतिनिधी – समाजात सेवाभावाने कार्य करुन वंचित, दुर्बल घटकांना आधार देणार्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सेवा सप्ताहाचा शुभारंभ रक्तदानाने करण्यात आला.कोरोना काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी लायन्सच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष डॉ. अमित बडवे यांच्या अध्यक्षतेखाली नगर-पुणे महामार्ग कोठी येथील श्री दीप हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये लायन्सच्या सदस्यांसह नागरिक व युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले.
यावेळी सचिव सुनिल छाजेड, प्रकल्पप्रमुख धनंजय भंडारे, हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी, सुधीर लांडगे, डॉ. सिमरन वधवा, डॉ. मीरा बडवे, कमलेश भंडारी, संदेश कटारिया, डॉ. सचिन घुले, डॉ. सतीश सुपेकर, डॉ. गणेश झरेकर आदी उपस्थित होते.
डॉ.अमित बडवे म्हणाले की, रक्तासाठी मनुष्याला मनुष्यावरच अवलंबुन रहावे लागते. कोरोनाच्या संकटकाळानंतर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तर सेवा सप्ताहानिमित्त आरोग्य शिबीर, वृक्षरोपण, वंचित घटकांना अन्न-धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.या शिबीरात रक्तदान करुन धनंजय भंडारे यांनी ६२ वेळा रक्तदान करण्याचा विक्रमी आकडा गाठला.भंडारे यांच्यासह रक्तदात्यांचा लायन्सच्या वतीने सन्मान करण्यात आला.