लेखिका चंद्रप्रभा पानसंबळ (माई) यांच्या दोन ग्रंथाचे प्रकाशन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुस्तकरुपी असलेले ज्ञान समाजाला दिशा देतात – आ.संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- आधुनिक विचारांना अध्यात्मक व संस्काराची जोड देऊन लेखिका चंद्रप्रभा पानसंबळ यांनी ग्रंथरुपाने वाचकांसमोर आपले अनमोल विचारधन आणले आहे. त्यांच्या पुस्तकरुपी ग्रंथातून स्त्री चा जीवन संघर्ष अधोरेखित होत असून,ही ग्रंथ संपदा आजच्या युवतींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

लेखिका चंद्रप्रभा गणपत पानसंबळ लिखित गणराज प्रकाशित देह होय चंदनाचा हे आत्मचरित्र व भक्तीचा तो ठेवा या धार्मिक ग्रंथाचे प्रकाशन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते.तपोवन रोड,निर्मलनगर येथे विठ्ठल मंदिर सभागृहात झालेल्या

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथ अधिकारी अशोक गाडेकर, रघुनाथ झिने,कमलताई सावंत,अंकुश शेळके,जालिंदर बोरुडे,नगरसेवक बाळासाहेब पवार,निखिल वारे,सुनील त्रिंबके,विनीत पाऊलबुद्धे, रवींद्र पानसंबळ, डॉ.संभाजी पानसंबळ,सौ.सुमन पानसंबळ, लेखिका चंद्रप्रभा पानसंबळ (माई), प्रकाशक प्रा.गणेश भगत, अभिजीत खोसे आदींसह परिसरातील नागरिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, पुस्तकरुपी असलेले ज्ञान समाजाला दिशा देत असते.डिजीटल युगात देखील पुस्तकांनी आपले महत्त्व टिकवून ठेवले आहे. वाचनाने विचार समृध्द होत असतात.तर जीवनाला एक दिशा मिळते.आयुष्यात पुस्तक, ग्रंथ वाचणे ही एक आनंदमय अनुभूती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत डॉ. संभाजी पानसंबळ यांनी केले.प्रास्ताविकात सौ.सुमन पानसंबळ यांनी लेखिका चंद्रप्रभा पानसंबळ (माई) यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचा संघर्षमय जीवन प्रवास मांडला.निखिल वारे, बाळासाहेब पवार, जयंत येलुलकर, रघुनाथ झिने यांनी आपले मनोगत व्यक्त करुन लेखिकेने आपल्या संघर्ष काळातील अनुभव इतर महिलांसाठी ग्रंथाच्या रुपात पथदर्शीपणे मांडला आणि त्याला भक्तीची जोड दिल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा ग्रंथ अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले की, आलेले अनुभव व जीवनातील संघर्ष शब्दबध्द केल्यास ग्रंथाची निर्मिती होत असते.लेखिकेने आपला संघर्ष व अनुभव उत्तमप्रकारे मांडले आहे.वाचन चळवळ वाढविण्यासाठी व लेखकांना एक व्यासपिठ निर्माण करुन देण्याचे कौतुकास्पद कार्य गणराज प्रकाशन करत असल्याचे सांगितले.तर गणराज प्रकाशनचे साहित्य चळवळीत सुरु असलेल्या योगदानाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत खाडे यांनी केले. आभार प्रकाशक प्रा.गणेश भगत यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र पानसंबळ,विक्रम पानसंबळ,अजिंक्य पानसंबळ,आदिराज भगत,संदिप ननवरे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!