लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत सारखी झाली – खा. सुनील तटकरे

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा कार्यकर्ता, पदाधिकारी मेळावा संपन्न

लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत सारखी झाली – खा. सुनील तटकरे

नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देश पातळीवर एन डी ए घटक पक्षांमध्ये मानसन्मान मिळत आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शेवटच्या घटकापर्यंत काम करावे, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या विरोधात अपप्रचार झाला तो कसा अयोग्य आहे हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

प्रत्येक निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर होत असते, राज्यात स्थानिक स्वराज्य मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायत सारखी झाली आहे, निवडणुकीमध्ये पक्षाला यश-अपयश येत असते मात्र नेहमीच लोकांच्या मनात दिशाभूल करता येत नाही.

महाराष्ट्र हे हुशार राज्य आहे, त्यामुळे काम करणाऱ्याच्या पाठीमागे ते नक्कीच उभे राहत असतात, नगर जिल्हा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून याचा आदर्श देशपातळीवर देखील घेतला जातो, आमदार संग्राम जगताप हे जमिनीवर पाय ठेवून काम करत असल्यामुळेच त्यांच्या कामाला यश येत असते, कार्यकर्त्यांनी त्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत घेऊन जावी व त्यांच्या निवडणुकीमध्ये मतधिक्याचे अर्धशतक गाठावे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा इंडियाचे सरकार स्थापन झाले आहे.

त्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती जनतेला द्यावी, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजव्यापी दौरा केला जाईल, आपल्या विजयामध्ये महिलांचा सिंहाचा मोठा वाटा असतो, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावे लागणार आहे, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच सरकारकडे मागणी करणार आहे, सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन काम केल्यास यश नक्कीच मिळत असते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा नगर दक्षिण पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलत होते.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आ. संग्राम जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, कुमारसिंह वाकळे, दत्ता पानसरे, प्रा. माणिकराव विधाते, अभिजित खोसे, समद खान, भा कुरेशी, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमध्ये 2019 प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यांमध्ये विविध भागाच्या विकासासाठी मोठा निधी दिला असून कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये राहून चांगले काम उभे करावे.

नगर शहराच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून विकासाची कामे सुरू आहेत, कार्यकर्त्यांनी आघाडी महायुती याकडे लक्ष न देता पक्षाची सूचना येईल त्याप्रमाणे काम करावे, निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी असे ते म्हणाले  कार्यक्रमाची प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी मांडले.

चौकट :

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील टीका करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, ते भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तयारीत होते ते चुकीचे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करत आहे, नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी निवडी जाहीर कराव्यात व जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करावे असे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles