लोकाभिमुख,कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी वासुदेव देसले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

‘वासुदेव’ नाव सार्थ ठरविणारे पोलीस निरीक्षक देसले

 

अहमदनगर (कमलेश गायकवाड ) – कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या लोकाभिमुख, कर्तव्यकठोर कार्यपद्धतीने प्रचंड लोकप्रिय झाले असून एरवी पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास घाबरणारे सर्वसामान्य लोक मोठ्या विश्वासाने त्यांच्या समस्या घेऊन येताना दिसू लागले आहेत.

कोपरगाव पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक देसले यांनी पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात विश्वासपूर्ण संवाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. राजकीय, सामाजिक दृष्ट्या संवेदनशील पोलीस ठाण्याचे कारभारी असतानाही त्याचा बाऊ न करता अत्यंत मुत्सद्देगिरीने त्यांनी कारभार करण्यावर भर दिलेला दिसून येतो. सामान्य लोकांमध्ये ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी नागरिकांना वेळकाळाचे कुठलेही बंधन न घालता थेट भेट देण्याची कार्यपद्धती शहरवासीयांना भावली नसेल तरच नवल.

कार्यक्षेत्रात घडलेल्या प्रत्येक घटनेच्या ठिकाणी त्वरित धाव घेऊन स्वतः आवर्जून उपस्थित राहणारे तसेच सहकार्‍यांची वाट न बघता मदतीला धावून जाणारे देसले यांना कोणी देवदूत संबोधतं, कोणी मोठा भाऊ बोलतोय, तर कोणी प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा अवलिया म्हणतात.

लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे कोपरगाव शहरवासी यांच्या तोंडात असणारे नाव म्हणजेच पोलीस निरीक्षक देसले. त्यांच्या कार्यपद्धतीची संपूर्ण जिल्ह्यात आदरपूर्ण चर्चा होत आहे. चोवीस तास कोपरगाव शहरातील नागरिकांची सेवा करत असताना कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच जनतेशी त्यांनी जोडलेले नाते हे कधीच विसरू शकत नसल्याचे कोपरगावकर भावुकपणे बोलतात.

कोपरगाव शहरांमध्ये कुठलेही सामाजिक कार्यक्रम असेल तर पोलिस निरीक्षक देसले त्या ठिकाणी जाऊन तेथील जनतेला संबोधित करत असतात कायद्याविषयी वेळोवेळी माहिती देऊन जागृकता निर्माण करताना दिसून आले आहेत. पोलीस निरीक्षकचे कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यात सामाजिक बांधीलकीचे असलेले भान लोकांना अचंबित करते.

सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करून त्यांनी नेटकऱ्यांमध्येही स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण तसेच अनाथ दिव्यांग, व्यक्तींना देखील त्यांनी थंडीच्या काळात उबदार कपडे तर पावसाळ्यात रेनकोट वाटप करण्याचा राबविलेला उपक्रम लोकांना आपलेसे करणारा ठरला.

हे सर्व करत असताना हद्दीत घडणारी कुठलीही लहान-मोठी घडामोड पोलीस निरीक्षक देसले यांच्या करड्या नजरेतून सुटत नाही,प्रत्येक गोष्टीवर,प्रत्येक घडामोडीवर ते बारीक लक्ष ठेवून असतात,याचा वेळोवेळी प्रत्यय आल्याने समाजकंटक, गुन्हेगार त्यांना चांगलेच वचकून असल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलीस निरीक्षक देसले यांच्या कार्यपद्धतीने कोपरगाव शहरात खऱ्या अर्थाने ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद सफल होताना दिसून येते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!