वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय.   

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय.           

दक्षिण व शिर्डी मतदार संघात लवकरच उमेदवार होणार जाहीर- प्रा. किसन चव्हाण.  

अहमदनगर (प्रतिनिधी)-  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले की लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्हा आणि शिर्डी मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडी लवकरच स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात आणि शिर्डी मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदार यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरवले आहे. सध्याला दोन्ही मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर दोन्ही उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थि राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गलांडे, राज्यसमन्वयक अरुण जाधव, जिल्हा अध्यक्ष नगर दक्षिण प्रतीक बारसे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक धनश्रीताई शेंडगे, उत्तर जिल्हाध्यक्ष महिला आघाडी वर्षाताई बाचकर, जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी निलेश गायकवाड, जिल्हा महासचिव शनेश्वर पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नेटके, कर्जत तालुका अध्यक्ष पोपट शेटे, तालुका अध्यक्ष युवा आघाडी पप्पू चव्हाण, कर्जत शहर अध्यक्ष राहुल मोहोळ, दादा समुद्र, जीवन पारदे, अमर निर्भवणे, मनोहर जिंदम, सिसिल भगत, प्रवीण ओरे, आबासाहेब रामफळे आधीसह पदाधिकारी व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!