वडगाव गुप्ता येथील हार्मनी इंटरनॅशनल स्कूल येथे जागतिक योग दिन संपन्न!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – विक्रम लोखंडे

आज दिनांक २१ जून रोजी १८० हून अधिक देशात जागतिक योग दिवस साजरा केला जातो.त्याची सुरुवात भारतापासून झालेली आहे.देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ पासून २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते.

त्या आवाहनाला प्रतिसाद देत वडगाव गुप्ता येथील हार्मनी इंटरनॅशनल स्कूलमधे जागतिक योग दिवस आज साजरा केला.

त्यावेळी आनंद योग केंद्राचे दिलीप कटारिया,चंद्रशेखर सप्तर्षी, दिलीप,प्रतीक्षा गीते तसेच भंडारी सर यांनी शिक्षक व विद्यार्थी यांना योगाचे धडे दिले. या कार्यक्रमाचे त्रावणकोर एज्युकेशन ट्रस्ट संचालिका नंदिता दास आणि अध्यक्ष बिना थंपि यांनी भरभरून कौतुक केले.

यानिमित्ताने शाळेतील शिक्षकवृंद यांना सात दिवसाचे प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली.शाळेचे प्राचार्य श्री अशोक बेरड यांनी योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.कोरोना प्रादुर्भाव नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!