वरुर मध्ये निसर्गाचा हाहाकार;अनेक स्वयंसेवकांनी दिले मदतीचे हात

0
90

शेवगाव प्रतिनिधी-निकेत फलके

शेवगाव तालुक्यातील वरुर बु व खुर्द येथे दि.३१ च्या मध्यरात्रीच्या पडलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी-नंदिनी व वटफळी या तिन्ही नदीला महापूर आला होता.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की,त्रिवेणी संगमावर वसलेल्या वरुर या गावी ३८ वर्षांनंतर महापूर आला होता.यात गावातील अनेक शेतकऱ्यांचे तूर,ऊस,सोयाबीन,कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच धायतडक वस्तीवरील अनेक शेतकऱ्यांची जनावरे गाय,बैल,म्हैस,शेळी नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.तसेच अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

यावेळी घडलेल्या नुकसानीचा प्रसंगावधान राखून अनेक स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांनी स्वतःहून मदत केली आहे.दुपारचे जेवण हनुमान गणेश मंडळ व विठाई महिला मंडळ जैन गल्ली,शेवगाव येथील टिंकूशेठ बंब,अभिषेक देहाडराय,दिपक आहुजा यांनी तर रात्रीचे जेवण श्री.सुनिल म्हस्के ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले होते.आजदेखील सकाळचे जेवण गोपी खडके,संतोष खडके यांनी तर रात्रीचे जेवण अजयभाऊ पलोड यांनी दिले.पिण्याच्या पाण्याची जारची व्यवस्था ज्ञानेश्वर गोसावी सर यांनी केली आहे.

महसुलचे तहसीलदार पागिरे मॅडम,बेरड साहेब तलाठी बेळगे मॅडम,ग्रामप्रशासन गटविकास अधिकारी डोके साहेब,ग्रामसेवक आव्हाड भाऊसाहेब,मनोज म्हस्के,संजय तेलोरे,अशोक येवले,किशोर तुजारे,आरोग्य विभागाकडून डॉ. शिरसाठ डॉ.खांबट तसेच सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी पुरात अडकलेले लोक सुरक्षित स्थळी हलवण्याची खूप कष्ट घेतले.यावेळी ओंकार भुजबळ,संदिप शेळके,सचिन म्हस्के,राजू वावरे,रामभाऊ म्हस्के,विकी खैरे,सचिन कदम,भारत म्हस्के,अमोल गुंड,आझाद शेख,महेश लव्हाट,नवनाथ म्हस्के,लखन म्हस्के,बाळू धायतडक,राहुल खांबट, गणेश मोरे,अशोक म्हस्के,अविनाश म्हस्के,किशोर खडके,गणेश बेडके,अशोक डांगरे,अशोक शेळके,अनिल वावरे आदींनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here