वर्ल्ड बुद्धिबळ डेप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देवेंद्र वैद्य यांची निवड
क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडत असतात – आ.संग्राम जगताप
नगर : क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडला जात असतो. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. खेळाडूंना खेळण्यासाठीच्या सुविधा व प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सारसनगर येथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारले जात आहे. या माध्यमातून शहरातील खेळाडूंना आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देवेंद्र वैद्य यांनी जिद्द,चिकाटी मेहनतीच्या जोरावर यश संपादन करीत आपल्या शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचे काम केले आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळात प्रदर्शन करणार असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमचे सहकार्य राहील असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
सर्बिया येथे होणाऱ्या वर्ल्ड बुद्धिबळ डेप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी देवेंद्र वैद्य यांची निवड झाल्याबद्दल आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते उपस्थित संपन्न झाला. यावेळी यशवंत बापट, संजय साठे, शैलेश गवळी, रोहित अडकर, अविनाश काळे, विकी वाघ, आदी उपस्थित होते.
देवेंद्र वैद्य म्हणाले की, आ.संग्राम जगताप नेहमीच खेळाडूंच्या पाठीमागे उभे राहत प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात. मला देखील वेळोवेळी सहकार्य केले आहे. खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या शहराच्या नावलौकिकात भर पडत असते सर्बिया येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून मी बुद्धिबळ खेळाचे चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
- Advertisement -