वाघोलीत विशेष शाखा कार्यालयाचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

0
87

वाघोली प्रतिनिधी – 

लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे शहर पोलीस दलात झाल्यानंतर येथील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी परिमंडळ ६ विशेष शाखा कार्यालयाचे उद्घाटन वाघोली येथे सोमवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याहस्ते करण्यात आले. केसनंद फाटा येथील पोलीस चौकीच्या आवारामध्ये विशेष शाखेचे कार्यालय कार्यरत राहणार असून लोणीकंद व लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतम्भूत गोपनीय घटनांचे रिपोर्टिंग येथून होणार आहे.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग नामदेव चव्हाण,पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, पोलीस उपाआयुक्त विशेष शाखा मितेश घट्टे, अप्पर पोलीस आयुक्त, प्रशासन जालिंदर सुपेकर, पोलीस निरीक्षक पदी ६ विशेष शाखा रमेश साठे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशा विशेष शाखा सुनील पवार, सहायक पोलीस अधिकारी सुरक्षा मिलींद पाटील,लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, शिवशांत खोसे, जयवंत पाटील, शिरूर हवेली आमदार अशोक पवार,जीप सदस्य माऊली कटके ,सरपंच वसुंधरा उबाळे, रामदास दाभाडे, शिवदास उबाळे तसेच वाघोली परिसरातील इतर लोकप्रतिनिधी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here