वाघ्या फाउंडेशनचे प्राण्यांविषयी प्रेम,भावना,दया संदर्भात सुरु असलेले काम कौतुकास्पद – प. पू. कुंदन ऋषीजी महाराज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आनंदधाम येथे वाघ्या फाउंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांना श्रद्धांजली

वाघ्या फाउंडेशनचे प्राण्यांविषयी प्रेम,भावना,दया संदर्भात सुरु असलेले काम कौतुकास्पद – प. पू. कुंदन ऋषीजी महाराज

नगर : समाजामध्ये आपण सर्वजण वावरत असताना मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, श्री भगवान महावीर स्वामी यांनी संदेश देताना सांगितले की जगा आणि जगू द्या, सर्वांना समान अधिकार आहे, प्राण्यांची रक्षा करा मात्र आपल्या देशामध्ये प्राण्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

वाघ्या फाउंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांची सेवा केली जात असून नागरिकांमध्ये प्राण्यांविषयी प्रेम, भावना, दया या संदर्भात माहिती दिली जात आहे हे काम कौतुकास्पद आहे, समाजात चांगले काम करणाऱ्यांचे जीवन सार्थक होत असते, सर्वांचा आत्मा एकच असतो, त्यामुळे प्राण्यांची हत्या केल्याने चांगली गोष्ट साध्य होत नाही असे प्रतिपादन परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज यांनी केले.

 

देशभर मुक्या प्राण्यांच्या होत असलेल्या कत्तलीच्या निषेधार्थ आनंदधाम येथे वाघ्या फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी परमपूज्य कुंदन ऋषीजी महाराज, परमपूज्य अलोकऋषीजी महाराज, वाघ्या फाउंडेशनचे सुमित वर्मा, मयुरी बनकर, मंगेश पटेकर, हर्षल  कटारिया, दर्शना मुजुमदार, ऋषिकेश परदेशी, संदेश सूर्यवंशी, रितेश रणमले, सुरज जपे आदी उपस्थित होते.

यावेळी परमपूज्य अलोकऋषीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!