मानवाने निसर्गावर व प्राण्यांवर प्रेम करावे – सुमित वर्मा
अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी
समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक नागरिकाणे मुक्या प्राण्यांवर व निसर्गावर प्रेम करावे,मुके प्राणी हे मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे त्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने पावले उचलली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज वाघ्या फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुक्या जनावरांच्या सुरक्षिततेच्या व सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत आमचे कर्तव्य पार पाडण्यात असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केले.
वाघ्या फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मुक्या जनावरांच्या सुरक्षतेसाठी सुरक्षा बेल्टचे वाटप करतांना फौंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा,राधिका रणभोर , साक्षी सोनवणे ,चिन्मय पंडीत ,राहुल वर्मा,योगेश गुंड ,जालिंदर शिंदे , अंजली लांडे आदी उपस्थित होते
सुमित वर्मा बोलताना पुढे म्हणाले की,रात्री चमकणारा गळ्यातील पट्टा रस्त्यावरील सर्व मुक्या जनावरांना बांधण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.शहरातील व महामार्गावरील अशा किमान १००० मुक्या प्राण्यांना हे बेल्ट लावण्यात येणार आहेत. रात्री प्रवास करत असताना लोकांना समोर प्राण्यांवरील नजरचुकीने होणाऱ्या अपघातातून माणसांना देखील दुखापतीला सामोरे जावे लागते आणि प्राण्यांना देखील प्राण या अपघातामुळे गमवावे लागते या जाणिवेने आम्ही हा उपक्रम राबविला आहे जेणेकरून रात्रीच्या होणाऱ्या अपघातातून या सर्व मुक्या जनावरांचे प्राण वाचतील. समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात आहे पण प्राण्यांच्या जिवाचा देखील विचार केला गेला पाहिजे या साठी वाघ्या फाऊंडेशन नेहमी कार्यरत राहणार असे ते म्हणाले.