वाडियापार्क येथील लक्ष्मी कलेक्शन व मोबाईल शॉपी दालनाचा शुभारंभ संपन्न

0
79

नोकरीवर अवलंबून न राहता युवकांनी व्यवसायात उतरावे – आ.संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

युवकांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरीवर अवलंबून न राहता आपल्या आवडीच्या व्यवसायाकडे वाटचाल करावी व्यवसाय करीत असताना ग्राहकांचा विश्वास संपादन करावा व्यवसायामध्ये जिद्द,मेहनत,चिकाटीची खरी गरज असते मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनेष साठे याचे सर्व क्षेत्रामध्ये चांगले संबंध असल्यामुळे लक्ष्मी कलेक्शन व मोबाईल शॉपी दालन ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.ओंकार साठे यांनी व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करून यशस्वी शिखराकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

वाडियापार्क येथील लक्ष्मी कलेक्शन व मोबाईल शॉपी दालनाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,मनेष साठे,ओंकार साठे,तेजस साठे,नंदा साठे,उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे चेअरमन आनंतराम मुनोत,जवाहर मुथा, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा,संभाजी कदम,विनीत पाउलबुद्धे,दत्ता कावरे,बाळासाहेब पवार, माणिकराव विधाते,अनिल पोखरणा,दत्ता जाधव,संजय बोरा,अशोक कानडे, संजय घुले,अनिल कोठारी,दीपक गांधी,शैलेश मुनोत,राजेंद्र अग्रवाल,महेंद्र गंधे,सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी,महेश तवले,सतिष बोथरा,अजित जगताप,गोरख पडोळे,मोहन कदम,रितेश मंडलेचा,अमित बुरा,साजित खान,अमोल खोले,किरण गवते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ओंकार साठे म्हणाले की, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे तरी ग्राहकांना मोबाईल क्षेत्रातील विविध सेवा पुरवण्याचे काम करू, व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांचा नक्कीच विश्वास संपादन केला जाईल असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here