अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या असून वाडिया पार्क येथे महिला खेळाडू व विद्यार्थिनी हे मोठ्या संख्येने ग्राउंड वर खेळण्यासाठी येत असतात त्यांना चेंजिंग रूम उपलब्ध होत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्यात यावे व तेथे महिलांसाठी चेंजिंग रूम फलक लावण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांना निवेदन देताना शिक्षक प्रवीण गीते समवेत संजय साठे, मकरंद कुल्हाळकर, अरुण चंद्रे, नंदू अष्टेकर, कल्पेश भागवत, दत्ता देवकर आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की महिला खेळाडूंना व विद्यार्थिनींना चेंजिंग रूम उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर चेंजिंग रूम देण्यात यावे व खेळाडूंना अशा प्रकारची परिस्थिती असेल तर खेळ क्षेत्रात खेळाडू वाढतील का हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला असून खेळाडूंना आवश्यक दैनंदिन सुविधा जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मार्फत होत नसेल तर जिल्हा क्रीडा अधिकारी हे काय करत आहे.यावर प्रश्न उपस्थित झाला असून खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे सांगून महिला खेळाडू व विद्यार्थिनींना चेंजिंग रूम उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.