वायू प्रदूषण निर्माण करण्याऱ्या वाहनांचा वापर टाळून सायकलचा वापर करणे गरजेचे – आ. संग्राम जगताप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर सायकलिंग असोसिएशन व अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या वतीने पंढरपूर सायकल वारी केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार संपन्न

 

नगर : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जगासमोर मोठे संकट उभे राहत आहे. आपला देश हा आता लोकसंख्या वाढीमध्ये सर्वात पुढे आहे. पर्यावरणाच्या बदलामुळे ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत आहे, त्यामुळे कुठल्याही महिन्यात थंडी, पाऊस, ऊन, वारा उष्णतेच्या लाटी निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे दिवसेंदिवस प्रदूषणाची गंभीर समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे, याचा उद्रेक होण्याआधीच हे रोखणे काळाची मोठी गरज आहे, त्यासाठी सर्वानीच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेणे त्यासाठी प्रयत्न करणे आता महत्वाचे आहे, आणि हीच गरज ओळखून अहमदनगर सायकलिंग असोसिएशन व अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या वतीने पंढरपूर सायकल वारी काढत नागरिकांमध्ये पर्यावरणाची जनजागृती करण्यात येत आहे. आमचे आजोबा यांनी देखील पंढरपूरची वारी सुरु करून धार्मिकतेचा वारसा सुरु केला तो जोपासण्याचे काम जगताप कुटुंब करत आहे तसेच प्रदूषण रोखण्यासाठी आज सायकलचा वापर करणे गरजेचे आहे. कोरोना काळानंतर नागरिकांमध्ये आरोग्य संदर्भात खऱ्या अर्थाने जनजागृती झाली असून त्यांना पर्यावरणाचे महत्व समजले आहे, वायू प्रदूषणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत असून वायू प्रदूषण निर्माण करण्याऱ्या वाहनांचा वापर करणे टाळून सायकलचा वापर करणे ही मोठी गरज आहे. त्यामुळे सायकल वारीद्वारे सायकलचे महत्व पटवून देण्याचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

अहमदनगर सायकलिंग असोसिएशन व अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या वतीने पंढरपूर सायकल वारी केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला. यावेळी चंद्रशेखर मुळे, अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, इंजि.केतन क्षीरसागर, दिनेश जोशी, संतोष ढाकणे, गणेश बोडखे, कानिफनाथ कोतकर, डॉ. महेश मुळे, लक्ष्मीकांत देशपांडे, जसमीत वधवा, पद्मिनी गुंजाळ, रोशन पठारे, मनोज येनगेंदूल, चेतन नवलानी, अक्षय गुरनानी, अमोल कुलकर्णी, अथर्व अक्षपुत्रे, मिनाक्षी पाठक, दिनेश संकलेचा, नागेश ढसाळ, सुरेंद्र हरीष, जयेश पातले, विनोद जाधव, संपदा देशपांडे, नचिकेत देशपांडे, अनिल सुराणा, विक्रांत कांडगे, महेश देवरे, प्रसाद भंडारी, निखिल मिसाळ, अभिजित मिसाळ, आनंद कुलकर्णी, श्रीकांत लोढा, भाविक नवलानी, सुवर्णा मुळे, रविंद्र दरेकर, यशराज ससे, श्रीनिवास वासळ, विष्णू बनसोडे, मोहन भोंबडे, हरविन्द्र नारंगे, सार्थक लोहर, कुबेर पाठक, राहुल भावसरे, नितीन पाठक, मनोज इंगळे आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर मुळे म्हणाले की, सायकलचे महत्व समाजाला पटण्यासाठी गेल्या ५ वर्षापासून सायकल वारी सुरु केली आहे, आम्ही सुरु केलेल्या सायकल वारीचे स्वागत आमदार संग्राम जगताप यांनी करून पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे, नगर शहरात सायकलस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तरी शहरात सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच नगर शहरातील सायकलस्वर आंतरराष्ट्रीय व देश भरातील विविध सायकल स्पर्धेत भाग घेत आहे लवकरच नगर ते हैद्राबाद अशी सायकल रॅली होणार आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!